राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटावरुन वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अनेक नेत्यांनीही अमोल कोल्हेंच्या या भूमिकेचा विरोध केला आहे. मात्र आता या सर्व वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली असून कलाकार म्हणून त्यांनी ती भूमिका केली असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे एकीकडे जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरींसारख्या नेत्यांची अमोल कोल्हेवरची नाराजी तर दुसरीकडे खुद्द शरद पवारांनी केली पाठराखण यामुळे राष्ट्रवादीतच २ गट पडल्याचं पाहायला मिळतं. याच पार्श्वभूमीवर हे प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेउया.
#SharadPawar #AmolKolhe #AmolMitkari #JitendraAwhad #ChandrakantPatil #JayantPatil #MaharashtraPolitics #NCP #BJP #WhyIKilledGandhi #NathuramGodse