राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या ठाणे मनपा आयुक्तांवर चांगलेच संतापले आहेत. ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे दलित आणि मुस्लिमविरोधी आहेत, असा आरोपच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केला. महापालिकेत आतापर्यंत इतके आयुक्त होऊन गेले. पण, त्यात कणा नसलेला हे पहिले आयुक्त आहेत, अशी टीकाही यावेळी आव्हडांनी केली. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारपासून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं. याच आंदोलनाला आव्हाडांनी सोमवारी रात्री भेट दिली आणि यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाडांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
#JitendraAwhad #EknathShinde #NCP #Thane #ThanePolitics #TMC #ThaneMC #MunicipalCorporation #Shivsena #MVA #SharadPawar