अखेर नॉट रिचेबल नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर!

अखेर नॉट रिचेबल नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाहून 'म्याव-म्याव' असा आवाज काढून त्यांना डिवचलं. त्यानंतर नितेश राणेंना हे प्रकरण चांगलंच महागात पडलं. यावरुन त्यांच्यावर टीका होत असतानाच आणखी एक प्रकरण नितेश राणेंच्या अंगलट पडलं. हे प्रकरण म्हणजे संतोष परब हल्ला प्रकरण. या प्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्यापासून ते अज्ञातवासात होते. त्यांचा फोनही नॉट रिचिबल होता. तर आता तब्बल 15 दिवसांनी नितेश राणे माध्यमांसमोर आले आहेत.

#NiteshRane #SantoshParab #NarayanRane #UddhavThackeray #BJP #AdityaThackeray #ShivSena #MyawMyawCase # SantoshParabCase #Sindhudurg #SindhudurgDistrictBank #MumbaiHighCourt #BHC #WinterSession #MaharashtraNews #VidhanBhavan #MahavikasAghadi #MVAGovernment #NiteshRaneArrest #BombayHighCourt


Next Story
Share it
Top
To Top