Utpal Parrikar यांना भाजकडून डच्चू?; Sanjay Raut अन् केजरीवारांची थेट ऑफर; गोव्याचं राजकारण तापलं

Utpal Parrikar यांना भाजकडून डच्चू?; Sanjay Raut अन् केजरीवारांची थेट ऑफर; गोव्याचं राजकारण तापलं

गोव्यासाठी भाजपची 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. गोव्यात भाजपच्या यादीत पणजीतून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. मनोहर पर्रीकरांचे कुटुंब हे आमचे कुटुंब आहे. उत्पल पर्रीकर यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही त्यांना पणजी सोडून इतर दोन मतदारसंघांचे पर्याय दिले आहेत. त्यांनी ते पर्याय नाकारले आहेत. आता दुसऱ्या पर्यायांवर त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. उत्पल पर्रीकर यांचे मन वळण्यात आम्हाला यश येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. आता ते खरं ठरणार कि नाही हे माहिती नाही परंतु उत्पल पर्रीकरांना इतर पक्षांकडून मात्र ऑफर येण्यास सुरुवात झाली आहे.

#UtpalParrikar #SanjayRaut #ArvindKejriwal #UddhavThackeray #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #BJP #Shivsena #MVA #Maharashtra #ManoharParrikar


Next Story
Share it
Top
To Top