Uddhav Thackeray यांच्या अनुपस्थितीत Sharad Pawar 'ठाकरे सरकार'मध्ये हस्तक्षेप करतायत?

Uddhav Thackeray यांच्या अनुपस्थितीत Sharad Pawar ठाकरे सरकारमध्ये हस्तक्षेप करतायत?

राज्यामध्ये गेल्या २ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, हा तिढा सोडवणं अद्यापही कोणाला शक्य होत नाहीय. हा संप मिटवण्यासाठी महाविकासआघाडीचे सरकार प्रयत्नशील आहेच. परंतु, अजूनही बहुतांश कामगार आपल्या विलनीकरणाच्या मागणीवर पूर्ण ठाम आहेत. तुम्हाला आठवत असेल तर पडळकर आणि खोत यांनी तात्पुरतं आंदोलन स्थगित करूनही एसटी कर्मचारी मागे हटले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न आणखी चिघळू नये म्हणून अखेर २ महिन्यांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. कर्मचाऱ्यांना संप मिटवण्याचं आवाहन केलं. पण पवारांचा हा हस्तक्षेप अर्थातच भाजपला रुचला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऍक्टिव्ह मोडमध्ये नसताना त्यांच्या खुर्चीवर बसून शरद पवारांनी बैठका घेणं असंवैधानिक असल्याचं म्हणत, पवार सरकारमध्ये नसताना त्यांनी हस्तक्षेप का केला? असा सवाल करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली. परंतु, भाजपची ही भूमिका खरंच किती योग्य आहे? त्यात तथ्य आहे का?

#UddhavThackeray #SharadPawar #ThackerayGovernment #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #ChandrakantPatil #MVA #BJP


Next Story
Share it
Top
To Top