राहुल गांधी आज घेणार काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक

राहुल गांधी आज घेणार काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारून पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्री आज (१ जुलै) राहुल गांधीची भेट घेणार आहेत. राहुल यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी करणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1145517547636346881

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यासोबत राहुल गांधी बैठक घेणार आहेत. राहुलच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे.

काँग्रेस कार्यसमितीच्या २५ मे रोजी झालेल्या बैठकीत राहुल यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यानंतर राहुल यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले. यानंतर दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू झाले आहेत. पराभवावर मंथन होण्याऐवजी राहुल यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची कसरत सुरू आहे.


Next Story
Share it
Top
To Top