मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरणार ?

मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरणार ?

औरंगाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी मनसेनंही दंड थोपटले आहेत. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं पाणी पुरवठा योजनेत औरंगाबादकरांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेनं केलाय. मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे आणि सुमित खांबेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

विमानतळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत एमआयएमतर्फे आंदोलन केले जाणार आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता विरोध वाढताना दिसतोय. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही विरोध केलाय. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्याला आता विरोध वाढताना दिसतोय.मुख्यमंत्री ज्या विमातळावर उतरणार आहेत, त्या विमानतळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत एमआयएमतर्फे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी एमआयएमचे कार्यकर्ते ठाकरे यांच्याविरोधात धन्यवादचे उपरोधिक बॅनर घेऊन उभे राहणार आहेत. तसेच शहराच्या न झालेल्या विकासाबद्दल धन्यवाद असे म्हणत एमआयएमतर्फे ठाकरे तथा राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली जाण्याचीही शक्यता आहे.

येत्या 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादचा दौरा करणार आहेत. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याची परवानगी जलील प्रशासनाकडे मागितली होती. मात्र, कायदा व सुव्यस्थेच्या मुद्द्यामुळे ती नाकारण्यात आली. त्यानंतर जलील यांनी ठाकरे यांच्याविरोधात उपरोधिक आंदोलन करण्याची शक्कल लढवली. त्यानुसार जलील यांनी शहराच्या न झालेल्या विकासाबद्दल धन्यवाद अशा आशयाचे फलक लावून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या उपरोधिक आंदोलनासाठी एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने अपस्थित असतील असे जलील यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांचा ताफा औरंगाबादमध्ये अडवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा कोणत्याही परिस्थितीत अडवण्याचा निर्णय घेतल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. खासदार संभाजीराचे छत्रपती यांना राज्य सरकारानं दिलेली आश्वासन पूर्ण केली नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे.


Next Story
Share it
Top
To Top