HW News Marathi
Karnataka Election 2018 देश / विदेश

येडियुरप्पा देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ?

बेंगळुरू | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले नसतानाही राज्यपालांच्या निमंत्रणामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे भाजप नेते येडियुरप्पा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. शुक्रवारी न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सत्ता प्रस्थापित करण्यासाठी बहुमत सिद्ध करावे लागेल असे सांगितल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी शुक्रवारी बोलताना आपण बहुमत सिद्ध करु असा विश्वास येडियुरप्पा यांनी व्यक्त केला होता.

परंतु शनिवारी बहुमत चाचणीत अपयश आल्यानंतर नाचक्की होण्याआधीच राजीनामा देण्याचा निर्णय येडियुरप्पांनी घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली पहायला मिळत आहे. बहुमत चाचणीपुर्वी राजीनामा देणे येत्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाला फायद्याचे ठरु शकते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाताच, येडियुरप्पा भाषणासाठी उभे राहतील आणि आपल्या राजीनाम्याची घोषणा करतील अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ??”, मिटकरींचा थेट फडणवीसांवर निशाणा 

News Desk

पतीने फोन उचलला नाही म्हणून आत्महत्या

News Desk

‘शिवसेना’ काढताना वंशंजांना विचारलं होतं का, ‘शिवसेना नको आता ठाकरे सेना करा’ उदयनराजेंचं सेनेला चॅलेंज….

Arati More