HW News Marathi
राजकारण

आता शिवसेनेची यादी देखील मुख्यमंत्रीच तयार करतील !

मुंबई | “आता मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की शिवसेनेच्या जागांची आणि उमेदवारांची यादी देखील तुम्हीच तयार करा. मी केवळ मुख्यमंत्र्यानी तयार केलेली यादी शिवसैनिकांसमोर सादर करेन”, असा उपहासात्मक टोला यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. “शिवसेनेचा कट्टर लढवय्या आता स्वगृही परत आला आहे”, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांचे शिवसेनेत स्वागत केले आहे. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

भास्कर जाधव यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपाबाबत विचारलेल्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी उपहासात्मक टोला लगावला आहे. “मी यावेळी एक वेगळा पर्याय सुचविला आहे. आता मी शिवसेनेच्या जागांची आणि उमेदवारांची यादी देखील मुख्यमंत्र्यांनाच तयार करण्यास सांगितली आहे. मग मुख्यमंत्र्यानी तयार केलेली ही यादी मी केवळ शिवसैनिकांसमोर सादर करेन”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) सकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर, दुपारी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव म्हणाले कि,”राष्ट्रवादीत माझे कोणाशीही भांडण नाही. मात्र, मी मुळात शिवसैनिक असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हते. मागील काळात गैरसमज निर्माण मी शिवसेना सोडली. मात्र, आता माझी चूक मला कळली आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांची भेट घेत भाजप-सेनेकडून एकमेकांवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न

News Desk

ब्रेकिंग! मॉलमधील राड्याप्रकरणी अखेर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

Manasi Devkar

शिवाजी पार्कवर सभा घेण्यास ओवेसींना परवानगी मिळते, मग राहुल गांधींना का नाही ?

News Desk