निवडणुकीच्या पराभवाला 'मी'च जबाबदार | राहुल गांधी

निवडणुकीच्या पराभवाला मीच जबाबदार | राहुल गांधी

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पराभवाला मी जबाबदार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी ४ पानाचे राजीनामा पत्र त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पोस्ट केले आहे. यानंतर राहुल यांनी त्यांच्या ट्वीटरवरील अकाउंटचे प्रोफाईल देखील बदलेले आहे. यात राहुल यांनी अध्यक्षच्या ऐवजी खासदार असा उल्लेख केला आहे. मी अध्यक्ष नाही, अध्यक्ष पदासाठी लवकर निवडणूका घ्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1146359704815194112

राहुल यांनी ट्वीट करत म्हटले की, “काँग्रेससाठी सेवा करण्याची संधी मिळाली हा माझ्यासाठी सन्मानाच आहे, ज्या पक्षाची मूल्य आणि आदर्शांनी देशाची सेवा केली आहे. मी देश आणि संघटनेचे आभार मानतो. जय हिंद” म्हणत राहुल गांधींनी म्हणाले. राहुल गांधींनी संसदेच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी बुधवारी (३ जुलै) प्रसार माध्यमांनी संवाद साधताना, आपल्या राजीनाम्याविषयी भूमिका स्पष्ट केली.

मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्ष पदावर आता मी नाही. आता काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असेल याचा निर्णय पक्षाची कार्यकारी समिती घेणार असल्याचे राहुल यांनी सांगितले. तसेच पक्षाने अध्यक्ष पदासाठी विनाविलंब निवडणूक घेऊन नव्या अध्यक्षाची निवड केली पाहिजे. आधीच राजीनामा दिलेला असल्याने मी या प्रकियेमध्ये सहभागी नसेन, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.


Next Story
Share it
Top
To Top