HW News Marathi
राजकारण

Shekhar Gore Exclusive | जयकुमार गोरेंचा बंधू असणे हि माझी चूक आहे का ?

माण-खटाव | राज्यात विधानसभेचे असे २ मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होऊनही या दोन्ही पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. त्यांपैकी पहिला म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघ आणि दुसरा म्हणजे माण-खटाव विधानसभा मतदारसंघ. या माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्याशी बातचीत केली आहे एच.डब्ल्यू.मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी. “जयकुमार गोरे यांचा बंधू असणं हि माझी चूक आहे का ? माझ्यासाठी बंधू असणं हा मुद्दा महत्त्वाचा नाही. आमची लढाई वैचारिक आहे”, असे स्पष्ट मत शेखर गोरे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

“माण-खटाव मतदारसंघ हा पहिल्यापासूनच शिवसेनेचा होता. तो शिवसेनेलाच मिळणार होता. मात्र, वरिष्ठ पातळीवर काय घडले माहित नाही. मी तो शिसेनेचाच मतदारसंघ होता म्हणून आम्हाला मिळाला”, असे शेखर गोरे यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना म्हटले आहे. या मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे हे शेखर गोरे यांचे बंधू आहेत. यंदा या दोन्ही भावांना एकमेकांचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शेखर गोरे म्हणाले, “मी राजकारणात उतरलो तो त्यांचा बंधू म्हणून नाही. मी त्यांचा बंधू आहे हि माझी चूक आहे का ? मी समाजकारण करतोय. येणाऱ्या काळात शिवसेनेला अपेक्षित असणारे ८०% समाजकारण अधिक २०% राजकारण करेन. ते माझे बंधू आहेत हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. आमची वैचारिक लढाई आहे.”

मी राष्ट्रवादी पक्ष सोडला नाही तर….!

अनेक नेते पक्षांतर करत आहेत. राष्ट्रवादी आणि रासपनंतर आता शेखर गोरे यंदा शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवर आहेत. त्यामुळे मतदारांना आपली भूमिका पटवून देणे हे आव्हान त्यांच्यापुढे आहे. याच पार्श्वभूमीवर शेखर गोरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि, “मी पक्ष सोडलाच नव्हता. काही कार्यकर्त्यांमुळे मला पक्ष सोडावा लागला होता. राष्ट्रवादीच्या चिन्हाखाली मी माणमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत सर्व संस्था माझ्या नेत्तृत्वाखाली सांभाळल्या होत्या. आम्ही सर्व कार्यकर्त्यांमध्ये माणमधील मेलेली राष्ट्रावादी सर्वांनी मिळून पुन्हा जिवंत केली.मात्र, माझ्यावर अन्याय होत होता.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही”, नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Aprna

पालिकेच्या मराठी शाळेच्या मुद्यावरून अमित साटम यांची शिवसेनेवर टीका

Aprna

मनोहर पर्रिकरच राहाणार गोव्याचे मुख्यमंत्री

News Desk