HW News Marathi
राजकारण

उदयनराजेंच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद आणखी वाढली !

नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) रात्री उशिरा आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन आज म्हणजेच शनिवारी (१४ सप्टेंबर) सकाळी दिल्लीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान यावेळी बोलताना “उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे आता राज्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे”, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते नाव जरी घेतले तरी सर्वांच्या मनात उर्जा निर्माण होते. त्याच छत्रपती शिवरायांच्या घराण्याचे नाव मोठे करणारे उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात उदयनराजेंना मानणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे निश्चितच राज्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी उदयनराजेंनी देखील मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

भाजप प्रवेशानंतर आता लगेचच उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी देखील सज्ज झाले आहे. आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे साताऱ्यात आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे. रविवारी (१५ सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सातारा जिल्ह्यात येणार असून यावेळी लोकांना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उदयनराजे यांनी सातारकरांना केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ शिंदे नाममात्र मुख्यमंत्री; महाराष्ट्राचा कारभार मोदी-शाह यांच्या इशाऱ्यावरच! – नाना पटोले

Aprna

#MarathaReservation : विधेयक न्यायालयात टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी करू !

News Desk

EXIT POLL : राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता येणार का ?

News Desk