बेल्जियमने जर्मनीवर २-१ मात करत उपांत्य फेरीत दिली धडक

बेल्जियमने जर्मनीवर २-१ मात करत उपांत्य फेरीत दिली धडक

भुवनेश्वर | हॉकी विश्वचषक स्पर्धेत बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीवर २-१ असा विजय मिळवला आहे. या विजयाने बेल्जियमने उपांत्य फेरीत धडक दिली आहे. जर्मनीच्या डिटर लिनेकोगेलने सामन्याच्या १४व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. परंतु ही आघाडी जर्मनीला टिकविण्यात यश आले नाही.

https://twitter.com/sports_odisha/status/1073196820518469633

बेल्जियमच्या अॅलेक्सझँडर हेनरीक्सने सामन्याच्या १८व्या मिनिटाला गोल करत जर्मनीशी १-१ ने बरोबरी केली. दोन्ही संघांकडून आक्रमण होत होते, परंतु त्यांचे बचावही उत्तम होत होते. अखेर सामन्याच्या ५०व्या मिनिटाला बेल्जियमला गोल करण्यात यश आले. टॉम बूनने ५०व्या मिनिटाला निर्णायक गोल केला.


Next Story
Share it
Top
To Top