हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा

हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा

भुवनेश्वर | पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. तेंडुलकरने शनिवारी(१५ डिसेंबर) ट्विटरवर याची अधिकृत घोषणा केली. हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल तेंडुलकरने मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि हॉकी इंडियाचे कौतुक केले.

https://twitter.com/sachin_rt/status/1073891033954574336

हॉकी विश्वचषक स्पर्धेतील यजमान भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीत भारताला १-२ अशा फरकाने नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. तरीही येथील हॉकी चाहत्यांनी प्रत्येक सामन्यात मोठ्या संख्येने हजेरी लावून स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला. शनिवारी(१५ डिसेंबर) झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत बेल्जियमने ६-० अशा फरकाने इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले. दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे.


Next Story
Share it
Top
To Top