क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

मुंबई | क्रिकेट सामन्यादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना भांडुपमध्ये घडली आहे. भांडूपमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान २४ वर्षीय वैभव केसरकर या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. क्रिकेट खेळताना वैभवच्या छातीत दुखू लागल्याने त्याला मैदान सोडावे लागले होते. यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वैभव गावदेवी संघाकडून क्रिकेट सामना खेळत होता. या सामन्यात गावदेवी संघाने प्रथम फलंदाजी केली. वैभव जवळपास तीन षटके फलंदाजी करत होता. यानंतर तो संघासह क्षेत्ररक्षणाला उतरला. परंतु वैभवच्या छातीत दुखू लागल्याने त्याला त्रास होऊ लागला. याची माहिती त्याने पंचांना दिली. यानंतर त्याने मैदान सोडले. त्याच्या मित्रांनी त्याला जवळच्या भाऊसाहेब रुग्णालयात दाखल केले. वैभवच्या अकाली निधनाने त्याच्या कुंटुंबावर शोककळा पसरली आहे.


Next Story
Share it
Top
To Top