ओडिशा। पुरुष हॉकी विश्वचषक यंदा भारतात होत असून ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आज (२७ नोव्हेंबर) संध्याकाळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार या समारंभात सहभागी होणार असून माधुरी दीक्षित या समारंभाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
https://twitter.com/Naveen_Odisha/status/1067259852752224257
क्रीडा सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार माधुरी दीक्षित या सोहळ्यात सहकलाकारांसह "धरती का गीत" नावाची नृत्यनाटिका सादर करणार आहे. या कार्यक्रमाला शाहरूख खानही हजेरी लावणार आहे. माधुरी दीक्षित सोबत ओडिया कलाकार आर्चित साहू आणि सब्यसाची मिश्राही त्यांच्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.
ओडिशाच्या कलिंगा स्टेडिअमवर २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार असून चौदाव्या विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होत आहेत.
हॉकी विश्वचषक स्पर्धा २०१८ चे ग्रुप
ग्रुप अ : अर्जेंटिना, न्यूझीलंड, स्पेन, फ्रान्स
ग्रुप ब : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आर्यलंड, चीन
ग्रुप क : बेल्जिअम, भारत, कॅनडा, दक्षिण आफ्रिका
ग्रुप ड : नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान