'सीएम चषका'ला युवकांमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद, १४ लाख लोकांचा सहभाग

सीएम चषकाला युवकांमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद, १४ लाख लोकांचा सहभाग

मुंबई | संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात आणि गल्लीबोळात चालू असलेल्या आतापर्यंतची सर्वात मोठी क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या 'सीएम चषका'बद्दल महाराष्ट्रभरात मोठा उत्साह दिसून येत आहे. 'सीएम चषक'मध्ये सहभाग घेण्यासाठी आतापर्यंत १४ लाख लोकांनी नोंदणी केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजित 'सीएम चषका'ला प्रदेश स्तरावर उत्तम प्रतिसाद तर मिळतच आहे, शिवाय मुंबई शहरातूनही अडीच लाखांहून जास्त युवकांनी यात नोंदणी केली आहे.

'सीएम चषका'साठी संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण १३ लाख ९२ हजार १०२ लोकांनी आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपली नोंदणी केली आहे. यात ५ लाख ४० हजार ८१६ लोकांनी ऑनलाईन आणि ८ लाख ५१ हजार २८६ लोकांनी थेट अर्ज भरून आपली नोंदणी केली आहे. यात मुंबईच्या एकूण सहभागी असलेल्याची २ लाख ६७ हजार ८०५ आहे. यामध्ये मुख्यत्वे युवक आणि विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी आहेत. खूप कमी वेळात 'सीएम चषका'शी मोठ्या संख्येने लोक जोडले गेल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चार्चे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी सांगितले कि प्रदेश स्तरावरील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाशी जोडले जाण्याच्या या प्रयत्नाच्या यशस्वीतेमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकासपुरुष असलेली प्रतिमा एकमेव कारण आहे. युवा मोर्चार्चे मुंबई अध्यक्ष मोहित कंबोज यांनी सांगितले कि मुंबईसारख्या व्यस्त शहरातही 'सीएम चषका'शी अडीच लाखांहून जास्त लोक जोडले जातात हि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेची एकप्रकारे पोचपावतीच आहे.

प्रदेश स्तरावरील प्रत्येक गाव आणि शहरात 'सीएम चषका'अंतर्गत होणाऱ्या क्रिकेट, कबड्डी, खो-खो, वॉलीबॉल, कॅरम, कुस्ती, पेंटिंग, रांगोळी, कविता, नृत्य इत्यादी स्पर्धांमध्ये लोक खूप उत्साहाने भाग घेत आहेत. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण आणि खासकरून महिलांमध्ये मोठा उत्साह आहे. महाराष्ट्रात भाजप सरकारला ४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १ नोव्हेंबरला पुण्यातून सुरु झालेल्या 'सीएम चषका'ची समाप्ती एका भव्य सोहळ्याच्या रूपात स्वामी विवेकानंद जयंतीला १२ जानेवारीला मुंबईत होईल.


Next Story
Share it
Top
To Top