'भारत आर्मी' अॅडलेड येथे दाखल, जडेजा-भुवनेश्वर कुमारने दिली भेट

भारत आर्मी अॅडलेड येथे दाखल, जडेजा-भुवनेश्वर कुमारने दिली भेट

नवी दिल्ली | कोणत्याही संघांचा सामाना सुरु असताना खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे चाहते कायमच हजर असतात. अशा चाहत्यांच्या टीम असतात. इंग्लंडच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 'बार्मी-आर्मी' ही इंग्लंडच्या चाहत्यांची टीम प्रत्येक ठिकाणी जात असते. आता भारताची 'भारत आर्मी' अॅडलेडला दाखल झाली असून या आर्मीला भारतीय क्रिकेट संघातील रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी भेट दिली.

https://twitter.com/BCCI/status/1069126027765473280

अॅडलेड ओव्हल येथे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी ६ ते १० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. अॅडलेड कसोटीनंतर १४ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना होणार आहे. तिसरा सामना मेलबर्न येथे २६ डिसेंबरला तर चौथा सामना सिडनी येथे ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.


Next Story
Share it
Top
To Top