भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, बीसीसीआयने विराटला सुनावले

भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, बीसीसीआयने विराटला सुनावले

मुंबई । 'भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, पैसे कमावतोस, हे विसरू नकोस' अश्या शब्दात बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला सुनावले. विराट कोहली वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे. विराटने एका चाहत्याच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना त्याला देश सोडण्याचा सल्ला दिला होता. त्याचे हे विधान क्रिकेट चाहत्यांना आवडले नाही. आणि त्यांनी त्याला सोशल मीडियावरून चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने विराटला सुनावले आहे.

विराट कोहलीने केलेले वादग्रस्त विधान

भारतीय फलंदाजांच्या तुलनेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा खेळ अधिक आनंददायी असतो, असे एका चाहत्याने लिहिले. या विधानाला उलट उत्तर देताना विराट म्हणाला की, ''तुम्ही भारतात राहू नका. तुम्हाला दुसरे देश आवडतात, मग तुम्ही आमच्या देशात का राहता?''

https://twitter.com/Hramblings/status/1059718366288637953

बीसीसीआयचे उत्तर

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,'' ते उत्तर म्हणजे मुर्खपणाच म्हणावे लागेल. त्याने असे विधान करण्यापूर्वी विचार करायला हवा. भारतीय चाहते गुंतवणूक करतात म्हणून कोहलीला पगार मिळतो, पैसे कमावतो, हे त्याने ध्यानात ठेवायला हवे.''


Next Story
Share it
Top
To Top