नवी दिल्ली | महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची महिला बॉक्सर मेरी कोमने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात अंतिम फेरीत यूक्रेनच्या हना ओखोटाचा ५-० ने पराभव करत मेरी कोम एक अनोखा विक्रम करणार आहे. ३५ वर्षीय मेरी कोम यांच्या नावावर महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेची प्रत्येकी ५ सुवर्णपदके जमा असून त्यात आज अजून एका सुवर्णपदकाची भर पडली आहे.
मेरी कोमने २००२, २००५, २००६, २००८ आणि २०१० च्या चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. आताच्या अंतिम सामन्यात मेरीने विजेतेपद पटकावून ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली आहे. या आधी पाच वेळा सुवर्णपदक पटकावण्याचा विक्रम आर्यलंडच्या केटी टेलरच्या नावावर होता.