...तर २०२३ वर्ल्डकपच्या यजमानपदाला भारत मुकणार

...तर २०२३ वर्ल्डकपच्या यजमानपदाला भारत मुकणार

नवी दिल्ली | ऑक्टोबर महिन्यात सिंगापूर येथे झालेल्या बैठकीतील आयसीसीच्या निर्णयाने बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. २०१६ साली टी-२० वर्ल्डकपकरिता दिलेल्या करमुक्तीची भरपाई म्हणून बीसीसीआयने १६१ कोटी रुपये भरावेत, असा आदेश आयसीसीकडून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या वर्ष अखेरपर्यंत बीसीसीआयने ही रक्कम न भरल्यास भारताला २०२३ साली होणाऱ्या वर्ल्डकपच्या यजमानपदाला मुकावे लागेल, असेही यावेळी आयसीसीने स्पष्ट केले आहे.

आयसीसीच्या या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास बीसीसीआयच्या महसूल वाट्यात कपात करण्यात येईल, असा इशाराही आयसीसीकडून देण्यात आला आहे. भारताला २०२१ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसह २०२३ साली होणाऱ्या वर्ल्डकपचे यजमानपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, बीसीसीआयने आयसीसीची आदेश न पाळल्यास भारताला हे यजमानपद गमवावे लागेल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

सिंगापूरमध्ये झालेल्या आयसीसी सदस्यांच्या बैठकीत ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते सर्व मुद्दे बीसीसीआयने मागविले होते. परंतु, अद्याप आयसीसीकडून बीसीसीआयला हे मुद्दे देण्यात आलेले नाहीत.


Next Story
Share it
Top
To Top