सायना नेहवाल-पी.कश्यप अडकले विवाहबंधनात

सायना नेहवाल-पी.कश्यप अडकले विवाहबंधनात

मुंबई | भारतीय महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि भारतीय बॅडमिंटनपटू पी.कश्यप हे दोघेही आज (१४ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले आहेत. सायना नेहवाल यांनी स्वतः बेस्ट 'मॅच ऑफ माय लाईफ' असे म्हणत ट्विटरद्वारे आपल्या लग्नाचे फोटोज शेअर करत ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही १६ डिसेंबरला विवाह करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, त्यांचा विवाह आज म्हणजेच १४ डिसेंबरला संपन्न झाला आहे.

https://twitter.com/NSaina/status/1073543794199384064

सायना नेहवाल आणि पी.कश्यप यांच्या विवाहासाठी जवळच्या अशा खास १०० लोकांना आमंत्रण देण्यात आले होते. तसेच पाच दिवसांनी रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, सायना आणि पी. कश्यप हे जवळपास गेल्या १० वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्या दोघांनीही आपल्या या नात्याबाबत कधीही अधिकृत घोषणा केली नव्हती. या दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.


Next Story
Share it
Top
To Top