मुंबई | ख्रिसमसच्या निमित्ताने जगभरात ठिकठिकाणी रोषणाई पाहायला मिळते. अनेक सेलिब्रिटी यादिवशी पार्टीचे आयोजन करतात. परंतु या सगळ्यात वेगळा असा ख्रिसमस सेलिब्रेट करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आहे. सचिनने सामाजिक भान जपत बच्चे कंपनींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम केले आहे. ख्रिसमस म्हटले की लाडका सँटा आपल्याला छानछान भेटवस्तू आणणार याची बच्चे कंपनी आतुरतेने वाट पाहतात.
https://twitter.com/sachin_rt/status/1077545327056560128
हा सँटा जर सचिन असेल तर त्यांची मज्जा काही ओरच असणार यात काही शंका नाही. सचिनने आज (२५ डिसेंबर) बच्चे कंपनींसाठी सँटा बनला होता. त्याने गरीब घरांतील मुलांसाठी काम करणाऱ्या आश्रय चाईल्ड केअर सेंटरला भेट देऊन त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. ख्रिसमसच्या निमित्ताने सचिन हा सँटा बनून आश्रमात दाखल झाला. थोड्यावेळानंतर त्याने आपली खरी ओळख मुलांना करुन दिली. त्यानंतर सचिनने त्या मुलांसोबत क्रिकेटही खेळला. त्या मुलांना छानछान गिफ्ट देखील दिले.