माझ्या जीवनातील हा काळा दिवस आहे | मिताली राज

माझ्या जीवनातील हा काळा दिवस आहे | मिताली राज

मुंबई | विश्वचषकाच्या इंग्लंडसोबतच्या सेमीफायनलमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू मिताली राज हिला बाहेर बसविण्यात आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी प्रशिक्षक रमेश पोवार यांनी अहवालात मिताली राजवर आपल्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता. या आरोपावर आता मिताली राजने प्रत्युत्तर दिले आहे. "माझ्या जीवनातील हा काळा दिवस आहे. रमेश पोवार माझे करियर संपवण्याचा प्रयत्न करत आहेत", असा प्रत्यारोप मिताली राजने केला आहे.

https://twitter.com/ani_digital/status/1068079813162864642

दरम्यान, "फलंदाजीच्या क्रमांकावरुन मिताली वाद घालायची आणि संन्यास घेण्याची धमकी द्यायची", असा आरोप रमेश पोवार यांनी आपल्या अहवालात केला होता. रमेश पोवार यांच्या आरोपांनंतर मिताली राजने ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करत पोवार यांच्यावर आरोप केले आहेत. "मी या आरोपांमुळे खूप दु:खी झाले आहे. माझ्या प्रतिभेवर, माझ्या देशभक्तीवर शंका उपस्थित केली जात आहे, असे मितालीने म्हटले आहे. "डायनाने पदाचा दुरुपयोग केला आहे. तसेच प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मला अपमानीत केले आहे", असा आरोपही मिताली राजने केला आहे.


Next Story
Share it
Top
To Top