पाकिस्तान-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यात नेमके काय घडले ?

पाकिस्तान-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यात नेमके काय घडले ?

नवी दिल्ली | अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सुरु होता. त्यावेळी पाकिस्तानचे खेळाडू इमाम-उल-हक खेळत असताना न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनचा एक चेंडू इमामच्या हॅल्मेटच्या जाळीला लागला. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. चेंडू लागल्यानंतर पहिल्यांदा इमाम मैदानावर खाली बसला. त्यामुळे मैदानावरील सर्वच खेळाडू भयभीत झाले.

https://twitter.com/ramizrap1/status/1060995270148788224

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर २१० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीराबरोबर हा प्रसंग घडला आहे.मैदानाबाहेर शोएबला घेऊन गेल्यावर त्याचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर शोएबला कोणतीही इजा झाली नसल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.


Next Story
Share it
Top
To Top