मेरी कोमची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

मेरी कोमची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

नवी दिल्ली | महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची महिला बॉक्सर मेरी कोमने प्रवेश केला आहे. मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या किम ह्यांग मीचा ५-० ने पराभव केला. या कामगिरीसह मेरी कोम एक अनोखा विक्रम करणार आहे.

३५ वर्षीय मेरी कोम यांच्या नावावर महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेची प्रत्येकी ५ सुवर्णपदकं जमा आहेत. मेरी कोमने २००२, २००५, २००६, २००८ आणि २०१० च्या चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. जर आताच्या अंतिम सामन्यात मेरीने विजेतेपद पटकावले तर हा तिचा ऐतिहासिक विजय असेल. या आधी पाच वेळा सुवर्णपदक पटकावण्याचा विक्रम आर्यलंडच्या केटी टेलरच्या नावावर आहे.


Next Story
Share it
Top
To Top