HW News Marathi
मुंबई

संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई | शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आले. यानंतर शिरसाट यांच्यावर उपचारासाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने (Air Ambulance) आज (18 ऑक्टोबर) मुंबईत आणले. आणि शिरसाट यांना सोमवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने औरंगाबाद येथील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले आणि डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. यानंतर शिरसाट यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांची तब्यात स्थिर आहे.

दरम्यान, शिरसाट यांना दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. तर शिरसाट यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिरसाट हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून त्यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्या आमदारापैकी एक शिरसाट आहेत. शिरसाट यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

औरंगाबाद पश्चिम येथील शिरसाट आमदार आहेत. शिरसाट हे शिवसेनेचे आमदार म्हणून तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी सुद्धा झाले आहेत. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत शिरसाट यांनी भाजपचे उमेदवार राजू शिंदे यांचा 40 हजार 747 मतांनी पराभव केला होता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांचे पाणी महागले

News Desk

मराठा आंदोलनात फूट पाडल्याचा आरोप राजकीय हेतूने

News Desk

पहिल्याच दिवशी महापालिका आयुक्तांचा जोरदार दणका

News Desk