HW News Marathi
मुंबई

कॉंग्रेस आमदारावर मनसे नेत्याचा पैशांचा पाऊस

मुंबई | दिवसेंदिवस वाढत्या इंधन दरवाढीमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे मुंबईत कॉंग्रेस आणि मनसे या पक्षांनी एकत्र येत आंदोलन केले होते. मोदी सरकारच्या काळात वाढत्या महागाईपासून जनतेला सुटका मिळावी यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत लढताना पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महागाई विरोधात भारत बंदची हाक दिली होती. या बंदला मुंबईत मनसे आणि कॉंग्रेसने एकत्र येत यशस्वी केले होते. हे दोन पक्ष एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार सुरु झाली होती. परंतु, आता पुन्हा एकदा कॉंग्रेस आणि मनसे चर्चेत आले आहेत. कारण, मनसे नेत्याने कॉंग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर पैसे उधळल्याचा प्रकार घडला आहे.

घाटकोपर परिसरात काल (रविवारी) गणेशोत्सवाच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री नसीम खान उपस्थित राहिले होते. यावेळी मनसेचे नेते महेंद्र भानुशाली यांनी नोटांचा वर्षाव करून नसीम खान यांचे स्वागत केले. महेंद्र यांची आई २०१२च्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवार होत्या. मराठी माणसासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतला गुजराती चेहरा म्हणून महेंद्र यांना ओळखले जाते. मनसेच्या अत्यंत वाईट काळात देखील त्यांनी पक्षाची आणि राज ठाकरे यांची साथ सोडली नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिका निवडणूक फ्रेंडली मॅच नाही, ही अस्मितेची लढाई; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

News Desk

मुंबईतील फोर्ट परिसरातील इमारतीचा भाग कोसळला!

News Desk

अजय देवगण घेऊन येणार भारतीय जवानांच्या गलवान खोऱ्यातील शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

News Desk