HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर ४ जण जखमी

पुणे | नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरजवळ शुक्रवारी (१८ जानेवारी) सकाळी आठच्या सुमारास ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींचे मृतदेह पुढील तपासणीसाठी कॉटेज रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

या अपघातातील मृत-जखमींची नावे

या अपघातात भूषण दिलीप वाळेकर (३३), आर्यन जयंत सांत्रस (१४) या दोघांना आपला जीव गमवावा लागला असून जयंत शामसुंदर सांत्रस, मोहिनी जयंत सांत्रस (४२), उषा शरद लोहारकर (६०), देवयानी भूषण वाळेकर (२३) हे चार जण जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप लाचार नाही, ‘होय’ युती आम्हाला हवी आहे !

News Desk

डोक्यात सत्तेची नशा गेल्याने दानवेंकडून बेताल वक्तव्येः खा. अशोक चव्हाण

News Desk

अध्यादेश परत पाठवण्यामागे ओबीसी आरक्षण घालवण्याचं सल्लागारांचं कटकारस्थान; विजय वडेट्टीवारांचा आरोप!

News Desk