HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे गारठले, ८.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

पुणे | पुण्यात आज (१७ डिसेंबर) सकाळी या हंगामातील सर्वात कमी म्हणजेच ८.३ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात राज्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दक्षिणेतील चक्रीवादळामुळे राज्यातील तापमान वाढण्याची शक्यता वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली होती. रविवारी सकाळी पुण्यात १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

पुढील काही दिवस पुण्याचे तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता. दरम्यान, सोमवारी सकाळी जळगाव ८.४, नाशिक ८.५, अहमदनगर ८.७, मुंबई १९, मालेगाव १०, सातारा ११.४, गोंदिया ११.५, बुलढाणा ११.६, सांगली ११.९ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी राजेंकडून कोल्हापूर पूर्वपरिस्थितीची पाहणी, म्हणाले……

News Desk

राज्यसरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करणार! – विजय वडेट्टीवार

Aprna

शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांचा पलटवार!

News Desk