HW News Marathi
राजकारण

रायगड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवीशेठ पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई | रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री रवीशेठ पाटील हे पक्ष बदल करणार असल्याची मोठी चर्चा रंगली होती. ही चर्चा खरी ठरवत अखेर रवीशेठ पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (५ फेब्रुवारी) रात्री उशिरा भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, रवीशेठ पाटील यांच्या पक्ष बदलामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

रवीशेठ पाटील यांचा अल्प परिचय

माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे कट्टर समर्थक तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून रवीशेठ पाटील यांची ओळख होती. रवीशेठ पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाचा एटीआर आज विधानसभेत मांडणार

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा शिवसेनेत गटात प्रवेश

Aprna

मराठा आरक्षणासाठी शहा आणि फडणवीस यांची दिल्लीत बैठक

News Desk