HW News Marathi
राजकारण

भाजपकडे कोणती तरी वॉशिंग पावडर आहे म्हणूनच… !

मुंबई |आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सुरु असलेल्या जोरदार इनकमिंगवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. “भाजपकडे कोणती तरी वॉशिंग पावडर आहे की आमच्यात आरोपी असलेले त्यांच्याकडे गेले की तांदळासारखे धुतले जातात”, असाही टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्याचप्रमाणे, “काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते हे ४ ते ५ कारणांमुळे पक्ष सोडून जात आहेत. ईडी, सीबीआय, कारखान्यांचे कर्ज अशा काही कारणांमुळे सध्या पक्षांतर सुरू आहे. ही दबावनीती आहे”, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे बोलत होते.

“विचारसरणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र, सध्या होणारे पक्षांतरे पाहता ही विचारसरणी कुठे गेली ? असा प्रश्न पडतो”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, “आम्हाला आमच्या जिंकण्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. यंदा राज्यात आघाडीचेच सरकार येणार. राज्यात येणारे सरकार आघाडीचे असो वा युतीचे त्यात कॅबिनेट आमचेच असणार कारण आमचेच लोक तिथे गेले आहेत”, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. त्याचप्रमाणे, “पवारसाहेबांसोबत दीर्घ काळ राहिलेले नेते दुसऱ्या पक्षांत जाऊनही साहेब आपल्या मनात असल्याचे सांगत आहेत. मला त्याचा आनंद आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत”,असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या भेटीसाठी नारायण राणे ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दाखल

Aprna

संतापजनक ! नांदेडमध्ये २ शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

News Desk

“तुम्ही तिकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवा,” राऊतांचा शिंदे गटाला टोला

Aprna