HW News Marathi
मुंबई

विलेपार्ले ते गोरेगावपर्यंत २० टक्के पाणी कपात

मुंबई | विलेपार्ले ते गोरेगावपर्यंत मंगळवारी २४ जुलै रोजी २० टक्के पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती जलअभियंता अशोककुमार तवाडिया यांनी दिली आहे. कारण या परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील १२०० मि.मी. व्यासाच्या ‘आरे’ तील अंतर्गत जलवाहिनीवर महत्वाचे काम येत्या २४ जुलै रोजी हाती घेण्यात येणार आहे. हे काम दुपारी २ वाजता हाती घेण्यात येणार असून त्याचदिवशी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे २० टक्के पाणी कपास होणार असून नागरिकांनी जपून पाण्याचा वापर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

 

अंधेरी व जोगेश्वरी पूर्व भाग बी. टी. रोड, समर्थनगर, आर. आर. ठाकूर मार्ग, प्रतापनगर, शिवटेकडी, पारसनगर, आनंदनगर अग्रवालनगर, जोगेश्वरी कॅव्हेज रोड, एच. एफ. सोसा. रोड,पी. पी. डायस कंपाऊंड, नटवरनगर 1 ते 5, सारस्वत बाग, फ्रान्सिसवाडी, साई सिद्धी संकुल, सुभाष रोड, बांद्रेकरवाडी येथे तर विलेपार्ले, अंधेरी व जोगेश्वरील पश्चिम भाग येथील पटेल इस्टेट, वैशालीनगर, अमृतनगर, एस. व्ही. रोड परिसर, शास्त्रीनगर, अक्षा मस्जिद परिसर, आर. सी. पटेल चाळ, क्रांतीनगर, गुलशननगर, अजित ग्लास परिसर, रेलीफ रोड, बेहराम बाग, विकासनगर, परेरा कंपाऊंड, शक्तीनगर, पटेलवाडी, स्काऊट कॅम्प रोड, काजूपाडा, आनंदनगर आदी ठिकाणी कपातीसह कमी दाबाने पुरवठा करण्यात येणार आहे. तर पाणी कपातीचा परिणाम देखील जाणवणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकी महिलेच्या कॅमेऱ्याने जगापुढे आणली कामाठीपुराची वस्तुस्थिती,अंडरवर्ल्डचा मोठा अड्डा

News Desk

पेट्रोल ४ रुपयांनी होणार स्वस्त

News Desk

नालासोपारा बॉम्ब प्रकरणी एटीएसने १२ जणांना ताब्यात घेतले

News Desk