"काँग्रेसला दूर ठेवून कोणतीही आघाडी होत असेल तर ते योग्य नाही!" - राऊत

काँग्रेसला दूर ठेवून कोणतीही आघाडी होत असेल तर ते योग्य नाही! - राऊत

मुंबई | "महाराष्ट्रमध्ये आमच्या महविकासआघाडीत मतभेद असले तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. काँग्रेसला दूर ठेवून कोणतीही आघाडी होत असेल तर ते योग्य नाही," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. राऊतांनी आज (४ डिसेंबर) सामनाच्या अग्रलेखातून देखील युपीएचे कौतुक केले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्र दौरा केला. यावेळी बॅनर्जींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतान त्यांना यूपीएसंदर्भात विचरल्यावर त्या म्हणाल्या, यूपीए आता कुठे आहे?, असा सवाल त्यांनी केला. यावर राऊत आज म्हणाल्या, "ममता जे बोलल्यात त्यात दम आहे की आज यूपीएचे अस्तित्व नाही, भाजपविरोधात कोणतीही आघाडी बनली तर ती काँग्रेससोबतच बनणार आहे. देशातील इतर राज्यात काँग्रेसचे अस्तित्व मजबूत आहे."

सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच आहोत

वीर सावरकरांच्या मुद्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच आहोत. वीर सावरकरांच्या विचार बाळासाहेबांनीच पुढे नेले असून हिंदूत्वाबद्दल आम्ही शिवसेनेने कधी यु-टर्न घेतला नाही. परंतु तुम्ही सावरकरांना भारतरत्न का देत नाही. तसेच प्रभू श्री राम यांचा ज्यांनी अपमान केलेल्या रामविलास पासवान यांनी तुम्ही घेऊन बसला होता ना, असा उलट सवाल त्यांनी भाजपला केला.


Next Story
Share it
Top
To Top