२०२४ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार येणार!

२०२४ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार येणार!

मुंबई | "२०२४ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार आहे," असा विश्वास पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल (१ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन मोदीविरोधात नवीन आघाडी उभी करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत देखील सर्व मोदीविरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, जनतेने मोदीवर विश्वास दाखवित बुहमताने त्यांना निवडून दिले. आता २०२४ मध्ये देखील असेच पुन्हा एकदा मोदीचे सरकार येणार आहे, असा विश्वास फडवीसांनी दाखविला आहे. महाराष्ट्रातून सहजासहजी उद्या नेहता नेणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

शरद पवार यांच्या साथिने ममता बॅनर्जी या काँग्रेसशिवाय नवीन आघाडी उघडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जींना गोवा आणि ईशान्य भारतात ममता बॅनर्जी त्यांचा पक्ष वाढी वाढवण्यासा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस विरोधी पक्ष नाही तर आम्ही मुख्यच विरोधी पक्ष आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी करत असल्याचे फडणवीसांनी आज (२ डिसेंबर) माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत.


Next Story
Share it
Top
To Top