राज्यात २८ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवले

राज्यात २८ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवले

मुंबई | देशात कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले आहेत. यानंतर राज्यातील विमानतळावर जवळपास ८०० जणांची RTPCR चाचणी करण्यात आली आहे. तर ८०० जणांपैकी २८ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (३ डिसेंबर) माध्यमांशी बोलताना केले आहे. तसेच कर्नाटक ओमिक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटकाच्या सीमेवर कडक निर्बंध लादण्यात आल्याची माहिती टोपेंनी सांगितले आहे.

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात आली असून राज्यातील विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच इतर राज्यातील लोकांनी महाराष्ट्रात येताना त्यांचा RTPCR रिपोर्ट असणे बंधनकारण असल्याचे काल (२ डिसेंबर) अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह सापडलेले रुग्णांचे जिनोमिक सिक्वेसिंगसाठी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात १२ तर पुण्यातील लॅबमध्ये १६ असे एकूण २८ नमुने पाठविले आहे. त्यामुळे जोपर्यंत या २८ जणांचे अहवाल येत नाही तोपर्यंत यावर व्यक्तव्य करणे गरजेचे नसल्याचे टोपेंनी सांगितले.


Next Story
Share it
Top
To Top